नवऱ्याकडे मोबाईलच्या हट्टापायी पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

Spread the love

नवऱ्याकडे मोबाईलच्या हट्टापायी पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

योगेश पांडे/वार्ताहर 

पिंपरी- चिंचवड – मोबाइलचा हट्ट न पुरवल्यामुळे पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास समोर आली. शिवानी गोपाल शर्मा – २० असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. सध्या सोशल मीडियाचा काळ असून जग अत्यंत जवळ आलेले आहे. लहानांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत मोबाईलचे व्यसन जडले आहे. परंतु, हाच मोबाईल न मिळाल्यामुळे शिवानी गोपाल शर्मा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवानी या गेल्या काही महिन्यांपासून पती गोपाल शर्मा यांच्याकडे मोबाईलचा हट्ट करत होत्या. गोपाल हे खासगी कंपनीत काम करतात. पैशाच्या अडचणीमुळे ते मोबाईल घेऊ शकत नव्हते. तरीही ते मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत होते. शिवानी घरी एकटीच असल्याने त्यांना मोबाईल हवा होता. अखेर तो हट्ट पूर्ण न झाल्याने बुधवारी त्यांनी घरात पती नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. पती जेव्हा नोकरीवरून घरी परत आला. तेव्हा पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले. वाकड पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर मोबाईलच्या हट्टा पायी पत्नीने गळफास घेतल्याचे उजेडात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon