तिहेरी हत्याकांडने रायगड हादरलं ! नदी काठी आढळले तिघांचे मृतदेह; पती, गर्भवती पत्नी आणि मुलगा यांचा समावेश

Spread the love

तिहेरी हत्याकांडने रायगड हादरलं ! नदी काठी आढळले तिघांचे मृतदेह; पती, गर्भवती पत्नी आणि मुलगा यांचा समावेश

योगेश पांडे / वार्ताहर 

रायगड – रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कर्जत जवळ असलेल्या कळम इथं ही घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह हे नदी काढी आढळून आले. त्यात पती, गर्भवती पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. त्यांच्या अंगावर वार केल्याचे गावकऱ्यांनी पाहीले. त्यानंतर नेरळ पोलीसांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास तातडीने सुरू केला आहे. ऐन गणपतीत तिघांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अजून पोलीसांनी काही सांगितले नाही. कर्जत जवळ चिकन पाडा आहे. या पाड्यावर मृत्यू झालेले कुटुंब राहत होते. पती पत्नी आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार होता. तर पत्नी गर्भवती होती. त्यामुळे कुटुंबात आणखी एक सदस्य येणार होता. पण त्या आधीच ही दुर्घटना घडली. नेरळ कळम दरम्यान एक नदी आहे. या नदीत रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान गावातील लोकांना या तिघांचे मृतदेह आढळून आले. त्यांनी ही बाब तातडीने नेरळ पोलीसांना सांगितली.

ज्या वेळी या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यावेळी त्यांच्यावर वार करण्यात आल्याचेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यामुळे पोलीसांना ही बाब सांगण्यात आली. मृत्यू झालेला तरूण हा ३५ वर्षाचा आहे. त्याचा लहान मुलाचाही मृत्यू झाला आहे. तर गर्भवती पत्नीही यात मरण पावली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ऐन गणपतीत गावात शोककळा पसरली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलीसांनी काही सांगितले नाही. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon