सोलापुरमध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणा तरुणाचा मृत्यू; डॉक्टरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; सरकारतर्फे पोलिसांकडून फिर्याद

Spread the love

सोलापुरमध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणा तरुणाचा मृत्यू; डॉक्टरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; सरकारतर्फे पोलिसांकडून फिर्याद

पोलीस महानगर नेटवर्क

मंगळवेढा – मंगळवेढा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूचे व्यसन असल्याने व्यसमुक्ती केंद्रात उपचारास दाखल केल्यानंतर उपचारात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी सरकारतर्फे पोलिसांनी फिर्याद दिल्याने डॉक्टरासह चौघांविरुद्ध पाच महिन्यांनंतर मंगळवारी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्या आला आहे. २ एप्रिल ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला होता. यात प्रवीण अमृत करंडे (वय २७, होमकर नगर, सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला होता.

डॉ. हर्षल थडसरे (वय ३६), अनिता हदीमनी (वय ३३, सिस्टर), आशिष जाधव (हेल्पर), संतोष हदीमनी (वय ४२, रुग्ण) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत. या प्रकारामुळे मयत तरुणाच्या नातलगांनी निष्काळजीपणा उपचारामध्ये दाखवल्याने कारवाईसाठी आंदोलन छेडले होते. पोलिसांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते. याप्रकरणी पाच महिन्यांनंतर चौकशीनुसार पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार भा.दं. वि. ३०४ (अ), ३६६,३३७, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण प्रवीण यास दारूचे व्यसन असल्याने त्याला मीरा हॉस्पिटल सर्व सुखी नगर व्यसन मुक्तीच्या उपचारासाठी २ ते ५ एप्रिल २४ दरम्यान दाखल केले होते. मयत प्रवीण करंडे याच्यावर उपचार करताना, हलगर्जीपणा दाखवल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे डॉक्टरसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon