अश्लिल भाषा वापरून महिलेचा विनयभंग व बदनामी केल्यामुळे एकावर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव – जळगाव शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे.जळगावच्या सिंधी कॉलनी येथील संतोषी माता मंदिरा जवळील दुकानावर नाश्ता घेण्यासाठी गेलेल्या महिलेला अश्लील भाषेत बोलून विनयभंग केला तसेच महिलेने पैसे घेतल्याचे समाजात बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका भागात ४२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महिला ही नाश्ता घेण्यासाठी सिंधी कॉलनीतील संतोषी माता मंदिराजवळील एसएसजी केटरिंग या दुकानावर गेल्या. त्यावेळी दुकानातील बबला नारायणदास तलरेजा रा. सिंधी कॉलनी याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील भाषा वापरून तिचा विनयभंग केला तसेच पैसे घेतल्याचे सांगून समाजात बदनामी केली. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी बबला नारायणदास तलरेजा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत.