मुंबईत घरगुती क्लासमध्ये घुसून माथेफिरूचा अल्पवयीन मुलांवर हल्ला; आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भायखळ्याच्या घोडपदेव परिसरात माथेफिरूने घरगुती क्लासेसमध्ये घुसून दोन अल्पवयीन मुलांवर चाकूने जिवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.या हल्यात दोन अल्पवयीन मुलं गंभीर जखमी झाली असून यातील एका मुलाला आरोपीने घरातचं कोंडून ठेवत त्याला मारहाण केली. वेळीच अल्पवयीन मुलाने या माथेफिरूची नजर चुकवून स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेत स्वत:चा जीव वाचवला.आरोपीने घरातील टिव्ही आणि इतर साहित्यांची मोडतोड करत, घरही पेटवण्याचा प्रयत्न केला. पाऊण तास माथेफिरू घरात धुडगुस घालत होता. अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी घरात प्रवेश करून या माथेफिरूला अटक केली.या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी लेबनंटा पटेल या आरोपीला अटक केली आहे.