शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना वाडा पोलिसांकडून अटक

Spread the love

शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना वाडा पोलिसांकडून अटक

प्रमोद तिवारी

पालघर – पालघर परिसरातील खणीवली येथे दि.१२/०७/२०२४ रोजी संध्याकाळी ०८.३० वा. ते दि १३/०७/२०२४ रोजी रात्रौ ०३.३० वा.च्या सुमारास मौजे खानिवली येथील फिर्यादी मनिषा सुहास भानुशाली, वय ५२ वर्षे व्यवसाय गृहिणी, रा. खानिवली ता. वाडा जि. पालघर हे त्यांच्या खानिवली येथील राहत्या घरी असताना कोणीतरी घराच्या दरवाज्यावर बाहेरुन लाथा मारत असल्याने फिर्यादी यांचे पती सुहास भानुशाली यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी ०४ अनोळखी आरोपीत हे घरात घुसले. सदर आरोपी पैकी एका आरोपीत याने फिर्यादीचे पतीचे चेह-यावर स्प्रे मारुन घरात जबरीने प्रवेश केला व फिर्यादी यांचे हात ओढणीने बांधुन व तोंडावर चिकटपट्टी लावुन घरातील बेडरुममधील कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने, एटीएम कार्ड तसेच हिरो होंडा स्प्लेन्डर मोटार सायकल, मोबाईल असा एकुण रु.२,३१,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हा जबरी चोरी करुन घेवुन गेले. याबाबत फिर्यादी यांच्या तक्रारीवरून वाडा पोलीस ठाणे येथे । २८१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (५), ३३३,१२७ (२) ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर व पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांनी गणपत पिंगळे उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांना तपास पथक तयार करून तपास करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, विजय डाखोरे, मयुरेश अंबाजी, पोहवा व्हि. मढवी, मपोहवा ३४२ देहेरकर, पोशि जी

जाधव, एस. वाकचौरे, बी. खिल्लारे, एच काळे यांचे तपास पथक तयार करून सदर पथकाने आरोपींचे कोणतेही धागेदोरे हाती नसताना, यांनी पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर जिल्हयात राबविलेल्या जनसंवाद अभियान अंतर्गत मिळालेल्या माहितीवरुन तसेच तांत्रिक विश्लेषणाव्दारे व कौशल्याने तपास करुन तपासात असे निष्पन्न झाले की, वाडा पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील आरोपी १) देवानंद रमेश तुंबडा वय ३१ वर्षे, रा. वसुरी खुर्द ता. वाडा जि. पालघर याने आरोपी २) संतोष कृष्णा तरे वय ३७ वर्षे, रा. सोनाळे ता. भिवंडी जि.ठाणे यास फियार्दी यांच्या घरात ५० लाख रुपये रक्कम असल्याची खबर दिली. त्यानंतर आरोपी संतोष तरे याने त्याचे साथीदार आकाश काळुराम संते वय २८ वर्षे, सध्या रा. सुप्रिमा ई, कासाबेला, पलावा सिटी डोंबिवली पूर्व यास देऊन तीन आरोपीनी फिर्यादीच्या घराची रेकी केली. त्यानंतर आरोपी १) अविनाश सुभाष पवार वय – २५ वर्षे, रा. एकुर्का, पो. जवळा खुर्द, ता. कळंब, जि.धाराशिव २) रॉकी उर्फ उमेश भैरु धावारे वय-३० वर्षे, सध्या रा.नेतीवली सुचक नाका, ओमबाबा टेकडी, कल्याण पुर्व, मुळ. रा. एकुर्का,पो. जवळा खुर्द, ता.कळंब, जि. धाराशिव ३) आकाश काळुराम संते वय-२८ वर्षे, रा. रुम नं.३०५, सुप्रिमा ई, पलावा कासा विला, डोंबिवली पूर्व, ता. कल्याण जि.ठाणे, मुळ. उसर, पो.निळजे, ता. कल्याण, जि.ठाणे ४) राम प्रकाश गायकवाड रा. कल्याण यांनी दि.१२/०७/२०२४ रोजी संध्याकाळी ०८.३० वा. फिर्यादीच्या घराच्या दरवाज्यावर बाहेरुन लाथा मारल्याने फिर्यादी यांचे पती सुहास भानुशाली यांनी दरवाजा उघडला त्यावेळी वरील ०४ आरोपीत यांनी जबरीने घरात प्रवेश करुन फिर्यादी व तिचे पती सुहास भानुशाली यांना तुमच्या घरात रु.५० लाख आहेत ते दया. असे सांगुन आरोपी रॉकी उर्फ उमेश भैरु धावारे यांनी सुहास भानुशाली यांच्या चेह-यावर रेड चिली स्प्रे मारुन, आरोपी अविनाश सुभाष पवार याने फिर्यादीच्या मानेवर कोयता ठेवुन व आरोपी आकाश काळुराम संते याने फिर्यादीच्या पतीच्या मानेवर कोयता ठेवुन, आरोपी उमेश भैरु धावारे याने फिर्यादीचे हात ओढणीने बांधुन व तोंडावर चिकटपटटी लावुन फिर्यादीच्या कानात घातलेले कर्णफुले जबरीने काढुन घेतले. व फिर्यादीचे पती यांच्याकडुन टीजेएसबी बँकेचे एटीएम व पासवर्ड तसेच फिर्यादी यांची मोटार सायकलची चावी घेऊन मोटार सायकल घेऊन आरोपी १) अविनाश सुभाष पवार व आरोपी ४) राम प्रकाश गायकवाड याने आयसीआयसीआय बॅक कुडुस येथील एटीएम मधुन रु.२००००/- काढले व पुन्हा फिर्यादीचे घरी येऊन वरील ०४ आरोपी यांनी फिर्यादीच्या घरात असलेले सीसीटिव्हि फुटेजचे डीव्हिआर काढुन व घरातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेवुन फिर्यादी व त्यांचे पती यांना घरात बेडरूममध्ये बसवुन घराचे दरवाजाची बाहेरुन कडी लावुन निघुन गेले.

सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान बातमीदारांकडून मिळालेल्या माहिती व तांत्रीक तपासाआधारे

आरोपी १) उमेश भैरु धावारे २) अविनाश सुभाष पवार यांना निष्पन्न करुन त्यांना त्यांचे राहत्या घरुन मौजे- एकुर्का ता. कळंब जि.धाराशिव येथुन अटक करण्यात आले आहे. व आरोपी ३) आकाश काळुराम संते यास सुप्रिमा ई पलावा कासा विला, डोंबीवली पुर्व येथुन अटक करण्यात आले. व टिप देणारे

आरोपी १. संतोष कृष्णा तरे वय ३७ वर्षे रा. सोनाळे ता. भिवंडी येथुन व २. देवानंद रमेश तुंबडा यास रा. वसुरी खुर्द ता. वाडा येथुन अटक करण्यात आले.

सदर तपासामध्ये आरोपीत यांनी फिर्यादी यांची कळंबोली येथे लपवुन ठेवलेली मोटार सायकल व गुन्हयात वापरलेले हत्यार तसेच चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागीने हे सोनार यशपाल सुरेशसिंग राजपुरोहित वय-२३ वर्षे, रा. कोहिनुर ज्वेलर्स, डोंबिवली पूर्व, मुळ. ग्राम पावटा, ता.आहार, जि. जालोर, राज्य- राजस्थान यांचे कडुन जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाट अपर पोलीस अधीक्षक पालघर, गणपत पिंगळे उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली दत्तात्रय किंद्रे पोलीस निरीक्षक वाडा पोलीस ठाणे, पोउपनिरी चंद्रकांत हाके, पोउपनि विजय डाखोरे, पोउनि मयुरेश अंबाजी, पोहवा व्हि. मढवी, मपोहवा ३४२ देहेरकर, पोशि जी जाधव, पोशि/एस. वाकचौरे, पोशि बी. खिल्लारे, पोशि ३६५ एच काळे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि मयुरेश अंबाजी, वाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon