अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपींवर जव्हार पोलिसांकडून कारवाई

Spread the love

अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपींवर जव्हार पोलिसांकडून कारवाई

प्रमोद तिवारी

पालघर – बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे हद्दित प्रभावी गस्त घालणे तसेच नाकाबंदी लावणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना व आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दि. २०/०७/२०२४ रोजी १८.०० वाजताच्या दरम्याण जव्हार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे व सोबत पोलीस उप निरीक्षक अनिल दिघोळे, पोहवा गायकवाड, पोहवा विटकर, वाहतुक शाखेचे सहा. फौजदार सालकर व पोना भोगाडे यांनी डहाणु नाका येथे नाकाबंदी करीत असतांना १८.४० वा.चे सुमारास नाशिक बाजुकडुन मनोरकडे जाणारी पांढऱ्या रंगाची एक महिंद्रा पिकअप गाडी क्र. एमपी.४६.जी.२२४९ ही डहाणु

नाका येथे आली. सदरची पिकअप गाडी संशयीत वाटल्याने वाहतुक शाखेचे सहा. फौजदार सालकर यांना सदर गाडी थांबविण्यास सांगितले. सादर गाडी थांबवुन चेक केले असता पिकअप मध्ये रिकामे भाजीपाल्याची प्लास्टीकचे कॅरेट दिसुन आले. सदर कॅरेटमध्ये चेक केले असता त्यातील खालील बाजुस असलेल्या एकुण सहा कॅरेटमध्ये प्लास्टीकमध्ये गुंडाळलेले गाठोडे दिसुन आले. ते

गाठोडे उघडुन बघितले असता त्यामध्ये उग्र वास येत असलेला हिरवट व काळपट रंगाचे पानाचा

वड्या केलेल्या व सफेद रंगाच्या कॅनबिज बिया असलेला गांजा सदृश्य अंमली गुंगीकारक पदार्थ

असल्याचे खात्री झाली. नमुद महिंद्रा पिकअप गाडी क्र. एमपी. ४६. २२४९ चे चालक व क्लिनर यांच्याकडे सखोल चौकशी केली असता पिकअप चालक याने त्याचे नाव १) सुनिल तुकाराम आर्य, वय २४ वर्षे, रा. तांडा फलीया जोगवाडा, ता. निवाली जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश व क्लिनर याने त्याचे नाव- २) श्रीराम दिनेश सोलंकी, वय २१ वर्षे, रा. पटेल फलीया जोगवाडा, ता. निवाली जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश असे सांगितले व सदरचा मुद्देमाल हा दिलीप चामार बर्डे रा. धोंदवाडा, ता. निवाली जि. बडवाणी, मध्य प्रदेश हा इसम मनोर येथील विनय अखिलेश्वर तिवारी व दिनानाथ मिश्रा रा. मनोर यांना देणार असल्याचे सांगितले. त्याआधारे आरोपी नामे विनय अखिलेश्वर तिवारी वय (३४ वर्षे) , सध्या राहणार गाळा नं. २६, आशा पारेख कंपाउंड, वालीव देवी मंदीर, वालीव नाका, वालीव वसई (पु.), मुळ पत्ता-ग्राम विश्रीली, तहसिल सलेमपुर जि. देवरीया, उत्तर प्रदेश यास मनोर येथुन ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. तसेच दिलीप चामार बर्डे व दिनानाथ मिश्रा रा. मनोर यांचा शोध चालू आहे. सदर इसमांकडुन खालील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सहा कॅरेटमध्ये एकुण ३१ किलो ८९८ ग्रॅम वजानाचे ७,९७,४५०/- रु. किंमतीचा गांजासदृश्य अंमली पदार्थ. ३,५०,०००/- रुपये किंमतीची महिंद्रा पिकअप गाडी क्र. एमपी. ४६. क्र २२४९ असा एकुण ११,५०,४५०/- रुपये एकुण किंमताचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर बाबत जव्हार पोलीस ठाणे येथे वरील इसमांचे विरुध्द गुरनं ॥ १६९/२०२४ गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा पोउनि/अनिल दिघोळे नेमणुक जव्हार पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कारवाई बाळासाहेब पाटील पोलीस अधिक्षक पालघर, पंकज शिरसाट अपर पोलीस अधिक्षक पालघर, गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संजयकुमार ब्राम्हणे, प्रभारी अधिकारी, जव्हार पोलीस ठाणे, पोउनि अनिल दिघोळे, पोहवा नंदकुमार गायकवाड, पोहवा प्रदिप विटकर, पोना सोपान भोगाडे सर्व नेमणुक जव्हार पोलीस ठाणे तसेच वाहतुक शाखेचे सहा. फौजदार चंद्रकांत सालकर यांनी उत्कृष्टरित्या केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon