आंदेकर टोळी सक्रिय; तरुणावर हल्ला; एकास अटक

Spread the love

आंदेकर टोळी सक्रिय; तरुणावर हल्ला; एकास अटक

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतेय. गुन्हेगारांच्या कृत्याची झळ सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. गुन्हेगारांना आपला राग आणि दहशत पसरवण्यासाठी ते सामान्य नागरिकांच्या गाड्यांना लक्ष करताना दिसत आहेत. शहरात तोडफोडीच्या घटनेत वाढ होताना दिसते. शहरात विविध कोयता टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. शहरातून दैनंदिन गुन्हेगारीच्या घटना कानावर पडत आहेत. त्यातच आता आंदेकर टोळीतील गुंडाने तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक केली असून साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वैभव चंद्रकांत गंगणे (२६, रा. सुमीत हाईट्स, १२७८, कसबा पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ देवदत्त आंदेकर, (२५, रा. नाना पेठ) याला अटक करण्यात आली. त्याचे साथीदार गणेश

अशोक वड्डू, आयुष बिडकर (दोघे रा. नाना पेठ), जयेश लोखंडे (रा. मंगळवार पेठ), पंकज वाघमारे (रा. हडपसर) यांच्यासह सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गंगणे याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंगणे आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. सोमवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास गंगणे आणि त्याचा मित्र मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंप परिसरातून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्याला गाठले. शिवीगाळ करून आरोपींनी मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, फरासखाना विभागाचे सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon