वादग्रस्तआईएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – वादग्रस्त पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं. मनोरमा खेडकरसह पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक पौड पोलिस ठाण्यात दाखल झालं. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते.गुरुवारी अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले आहेत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली आहे. मनोरमा खेडकरची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खेडकरला ससून रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर तिला कोर्टात देखील हजर केल्यानंतर पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे.धमकी प्रकरणतील सखोल चौकशी केली जाईल. मनोरमा खेडकरला गुरुवारी महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला आणण्यात आलं आहे. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.