चुलत भावाकडून २३ वर्षीय बहिणीवर अत्याचार; खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
पनवेल – तालुक्यातील सूकापूर परिसरातील मालेवाडी एका २३ वर्षीय मुलीवर चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अत्याचारी भावाचा शोध घेत आहेत. मालेवाडी येथील २३ वर्षीय तरुणाने चुलत बहिणीचा विश्वास संपादन करुन तीला प्रेमसंबंधात गुंतवले. मागील वर्षी ३० ऑक्टोबर ते १७ जुनपर्यंत अत्याचारासाठी भाड्याने वेगळे घर घेऊन पिडीतेवर अत्याचार केल्याचे पिडीतेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.