सोन्याची बिस्किटे कमी दरात विकण्याचे अमिष देत ज्वलेर्स मालकाची १३ लाखांची लूट, सात गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे /वार्ताहर
नवी मुंबई – पोलीस असल्याचा आव आणत एका ज्वेलर्स मालकाची १३ लाख रुपयांची लूट करणाऱ्या सात आरोपींना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. सोन्याची बिस्कीचे अत्यंत कमी दराने विकत असून ते खरेदी करण्यासाठी खारघरला येत असल्याचे आरोपीने फेसबुकवर ज्वेलर्स मालकाच्या मित्राला सांगितले होते. मित्राने ही माहिती ज्वेलर्स मालकाला दिली, पण त्यांच्या हे लक्षात आले नाही की, हा एक सापळा दरोडेखोरांनी त्यांची लूट करण्यासाठी रचला होता. खारघर येथे २६ जून रोजी ही घटना घडली होती. फिर्यादी रवींद्र चौधरी – ५० त्यांचा मित्र आणि एक कर्मचारी १३ लाख रुपयांची रक्कम घेऊन सोन्याच्या बिस्किट विक्रीसाठी त्यांच्या कारमधून खारघरला चालले होते. तेव्हा एका एसयूव्हीमधून चार जण पोलीस असल्याचे सांगत त्यांच्याजवळ गेले. कर्मचाऱ्याकडे पैशाची बॅग होती त्यामुळे दरोडेखोरांनी त्याला कारमधून बाहेर ओढले आणि त्याला त्यांच्या एसयूव्हीमध्ये बसवले. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याकडून पैशाची बॅग हिसकावून घेतली आणि त्याला गाडीच्या बाहेर फेकून दिले.
नवी मुंबई केंद्रीय गुन्हे शाखेने आरोपींना बुधवारी, १० जुलै रोजी अटक केली. गुन्हे शाखेने आरोपींकडून एकूण १२,२७,३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने जप्त केली आहेत गुन्हे शाखेने जप्त केली आहेत.