पत्नीचे अनैतिक संबंध,पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

पत्नीचे अनैतिक संबंध,पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

भाईंदर – पत्नीचे असलेले अनैतिक संबंध आणि ती दोन्ही मुलांना घेऊन निघून गेल्याने निराश झालेल्या व्यापार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीतून याचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आला आहे. ललित भगवतीलाल जैन – ३७ असे मयत व्यापार्‍याचे नाव आहे. तो मिरा रोड येथील रामदेव पार्क मधील अन्नपूर्णा इमारतीत पत्नी अनू जैन तसेच (६) आणि (१३) वर्षांच्या मुलीसह रहात होता. गेल्या काही वर्षाापासून दोघांच्या नातेसंबंधामध्ये वाद निर्माण झाला होता. ललितची पत्नी अनू हिचे शिव सिंग नामक एका इसमाशी प्रेमसंबंध होते. यापूर्वी दोन वेळ अनू घर सोडून गेली होती. मागील आठवड्यात अनू जैन पुन्हा एकदा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घर सोडून गेली होती. पती ललित विरोधात तिने वालीव पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. २४ जून रोजी पोलिसांनी ललितला चौकशीलाही बोलावले होते. घरी आल्यापासून ललित तणावात होता. २५ जून रोजी ललितने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी आपल्या मृत्यूस पत्नी अनु आणि तिचा प्रियकर शिव जबाबदार असल्याची चिट्टी त्याने लिहिली होती. यावरून ललितचे वडील भगवती जैन -६२ यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मयत ललिची पत्नी अनू आणि तिचा प्रियकर शिव सिंग यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती तपास अधिकारी राहुल साळुंखे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon