दागिने व रोकडची रस्त्यात पडलेली बॅग शोधण्यात मानपाडा पोलीसांना यश; संबंधित महिलेला केली परत

Spread the love

दागिने व रोकडची रस्त्यात पडलेली बॅग शोधण्यात मानपाडा पोलीसांना यश; संबंधित महिलेला केली परत

योगेश पांडे – वार्ताहर 

डोंबिवली – कारमधून उतरताना महत्वाची कागदपत्रं तसेच लाखोंचे दागिने आणि रोकड असलेली बॅग रस्त्यात पडल्याने डोंबिवलीत एका महिलेला जबर धक्का बसला. तिने तातडीने मानपाडा पोलिसांकडे धाव घेतल मदतीची याचना केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तातडीने तपास सुरू केला आणि काही दिवसांतच ती बॅग शोधून संबंधित महिलेला परत केली. एका बाईकच्या फाटलेल्या सीटचा क्लू त्यांच्याकडे होता आणि त्या एवढ्याशा क्लू वरूनच पोलिसांनी ती बॅग शोधून काढली. पोलिसांच्या या दक्ष काराभारामुळे त्या महिलेचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले आणि तिने सुटकेचा नि:श्वास टाकला. डोंबिवलीतील या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. डोंबिवली पूर्व परिसरात राहणाऱ्या कविता परब या कुटुंबीयांसोबत काही दिवसांपूर्वी जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. मात्र तेथे त्यांच्या लक्षात आले की, कारमधून उतरताना त्यांचे दागिने आणि रोकड असलेली बॅग रस्त्यात पडली. त्यामुळे घाबरलेल्या कविता यांनी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत सर्व प्रकार कथन केला. त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी या प्रकरणाच्या तपासाकरिता पथक नेमले.

त्या बॅगचा तपास करताना पोलिस कर्मचारी मंदार यादव आणि अन्य पोलिसांनी तब्बल २४ इमारती पालथ्या घातल्या. ज्या ठिकाणी बॅग पडली होती तो भाग सीसीटीव्हीत दिसत नाही. मात्र त्या आसपासचा परिसर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. तेथील फुटेज पोलिसांनी नीट तपासले असता, तेथे त्यांना झोमॅटोचा एक माणूस आणि स्विगी कंपनीचा एक डिलीव्हरी बॉय दिसला. त्या दोघांपैकीच कोणीतरी ती बॅग घेतली हे पोलिसांना निश्चित समजले . पोलिसांनी अधिक तपास सुरू केला तर स्विगी बॉयने ही बॅग घेतली असल्याचे उघड झाले. त्याला शोधण्यासाठी पोलिस हे रिजन्सी अनंतम या संकुलातील २४ इमारतींत फिरले. तेथीली सीसीटीव्हीही चेक केले. अखेर स्विगी बॉय कुठे आला होता याचा सुगावा २४ व्या इमारतीत लागला. त्यानंतर त्या स्विगी बॉयच्या दुचाकीकडे त्यांचे लक्ष गेले, ती फाटलेली होती. त्या फाटलेल्या सीटवरूनच पोलिसांनी त्याचा शोध घेतला. स्वप्नील कोला असे त्याचे नाव आहे. ती बॅग माझ्याकडेच आहे अशी कबली स्वपिलने दिली. मात्र आपण बॅगेला हातही लावलेला नाही. ही बॅग कोणाची आहे हे मला माहीत नव्हते असे त्याने सांगितले. नंतर ती दागिन्यांची बॅग त्याने पोलिसांना परत दिली. अथक प्रयत्नाअंती ताब्यात घेतलेली दागिन्यांची बॅग वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस कर्मचारी मंदार यादव आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी कविता यांना परत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon