महाराष्ट्र हादरला ! १४ वर्षीय मुलीवर नराधामांचा सामूहिक अत्याचार; तिघां नराधामांचा बेड्या

Spread the love

महाराष्ट्र हादरला ! १४ वर्षीय मुलीवर नराधामांचा सामूहिक अत्याचार; तिघां नराधामांचा बेड्या

पोलीस महानगर नेटवर्क

अकोला – महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी अकोल्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला फसवून तिला मुलांच्या वसतिगृहात नेण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर सलग तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अकोला शहरातल्या रामदास पेठ भागातील मुलांच्या वसतिगृहात हा प्रकार घडला आहे.

अंकुश, अनुराग आणि दिपक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत. या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय विद्यार्थिनी ७ जून रोजी कोचिंग क्लासला जाते असं सांगत घराबाहेर पडली. रात्री बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. शोधाशोध करूनही तिचा थागपत्ता न लागल्याने कुटुंबियांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अखेर अल्पवयीन मुलगी दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जूनला घरी परतली. तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी खाजगी शिकवणी क्लास जाण्यासाठी रस्त्याने जात असतानाच अंकुश नावाचा तरुण तिच्या जवळ आला अन् तिला फसवत, आमिष देत अकोला शहरातल्याच रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका मुलांच्या वस्तीगृहात घेऊन गेला. दरम्यान अंकुश हा अकोल्यातील कौलखेड भागातील मूळ रहिवासी आहे. मात्र त्याचाच मित्र वसतीगृहात राहत होता. दिपक चौधरी असे त्याचे नाव असून या तरुणाशी अंकुशची चांगली मैत्री आहे. येथील वसतिगृहातल्या चौधरीच्या खोलीत तिच्यावर तिघांना सामूहिक अत्याचार केला, ही घटना ७ ते ८ जूनच्या रात्री घडली. अंकुश वक्ते, अनुराग चौधरी आणि दिपक मडावी या तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तिने बाल कल्याण अधिकाऱ्यांसमोर पोलिसांना सांगितला. अशी माहिती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिली आहे. तिघांविरुद्ध बाल संरक्षण कायद्यांतर्गत तसेच अपहरण आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच काही वेळातच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.वसतिगृहांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याची खंत नागरिक बोलताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon