धक्कादायक ! तक्रार द्यायला आलेल्या तरूणीकडे पोलीस अधिकाऱ्यानेच केली शरीरसुखाची मागणी

Spread the love

धक्कादायक ! तक्रार द्यायला आलेल्या तरूणीकडे पोलीस अधिकाऱ्यानेच केली शरीरसुखाची मागणी

पोलीस महानगर नेटवर्क

भंडारा – भंडारा शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक करणाऱ्या आपल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल करायला गेलेल्या तरूणीलाच चक्क पोलीस अधिकाऱ्याने आपण डेट वर जाऊ अशी गळ घातली.अशा पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा संतापजनक प्रकार भंडाऱ्यामध्ये घडला आहे. भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका तरुणीने केला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अशोक बागुल यांच्या विरोधात भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे. शिक्षण घेत असताना तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. सात वर्षे ते दोघे नातेसंबंधात होते, यादरम्यान तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पण लग्नाचा विषय काढल्यानंतर तो सातत्याने उडवाउडवीचे उत्तर देत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच न्याय मिळवण्यासाठी पीडित तरुणी १ जून रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अशोक बागुल यांच्या कार्यालयात धाव घेतली. पण यावेळेस जे काही घडले ते अतिशय चीड आणणारे होते.

यावेळेस बागुल यांनी तिला केबिनमध्ये बसवले आणि “तू सुंदर आहे. आत्महत्या करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला मदत करतो. पण माझी एक अट आहे. तू आणि मी जवळचे मित्र होऊ. तुझे आयुष्य बदलेन. तू सुशिक्षित आणि सुंदर आहे. मी अजूनही तरुण आहे. आपण डेटवर जाऊ. तू मला त्यासाठी मदत कर. मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. माझ्या वयावर जावू नकोस. मी तुला आयुष्यभर सांभाळेन. हे तू कोणाला सांगू नकोस”, असे म्हणत बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचं जाणवल्याने पीडितेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांच्या विरोधात रात्री उशिरा भंडारा पोलिसात भादंवी कलम ३६४ अ (२), ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळं पोलीस प्रशासनात मात्र मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सध्या सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon