धक्कादायक ! अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले,अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
अमळनेर – अमळनेर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहादा (जि. नंदुरबार) येथील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना ३ रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा येथील अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडिलांसोबत अमळनेर शहरात ताडेपुरा येथे आली होती. धार्मिक कार्यक्रमासाठी ३ रोजी सकाळी ९ वाजता गांधलीपुरा भागात आली. दुपारी सर्व कुटुंब ताडेपुरा येथे जाण्यासाठी निघाले असता त्यांना मुलगी दिसून आली नाही. गांधलीपुरा, ताडेपुरा येथे शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. म्हणून शहादा येथे मुलगी आली आहे का याची चौकशी केली. मुलगी सापडली नाही म्हणून तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.