नवी मुंबईत अवजड वाहनांची चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरटीओचे तीन अधिकारी सामील

Spread the love

नवी मुंबईत अवजड वाहनांची चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरटीओचे तीन अधिकारी सामील

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी केले पर्दाफाश केला असून टोळी विविध राज्यातून मोठमोठे ट्रक्स चोरी करून इतर राज्यातून महाराष्ट्रात आणून बनावट चेसी नंबर व कागदपत्राच्या आधारे अवजड वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ए.पी.एम.सी. पोलीस ठाणे हदि‌तील सेक्टर १९ बी, १९ सी परिसरात, एपीएमसी मार्केट, वाशी नवी मुंबई येथे काही वाहने परराज्यातुन चोरी करून त्यांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून, विक्री करून मुळ मालकांची, विमा कंपन्याची फसवणुक केली जात असल्याची गुप्त माहीती मिळाली असता पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, दिपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई अजयकुमार लांडगे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीची शहानिशा करून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली असून एपीएमसी पोलीस स्टेशन भादवी कलम ४२०,४६५,४६७,४६८,

४७१,४१३,२०१,४०१,१२० (ब) अन्वये दि. ७ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांकडून गुन्ह्याचा उलघडा

गुन्हयात आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यामुळे गुन्हयाचा सखोल तपास करणेकरिता अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चादेकर, पोलीस उप निरीक्षक संजय रेडडी, पोलीस उप निरीक्षक प्रताप देसाई व पोलीस अमंलदार असे विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. पोलीस पथक यांनी तपास करत असताना खबरीद्वारे ही टोळी संभाजीनगर येथून कार्यरत असून त्याचा सूत्रधार आरोपी जावेद अब्दुला शेख उर्फ मणीयार, किराडापुर हा असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर छत्रपती संभाजीनगर येथून त्याला २२ मार्चला अटक करण्यात आली. सूत्रधार हाती लागल्याने गुंता उकलत गेला. जावेद अब्दुला शेख उर्फ मनियार याने देशभरातील विविध राज्यांतून चोरी करून त्याचे चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकात फेरबदल करून, वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीप्रमाणे अल्युमिनियमच्या इंजिन नंबर प्लेट बनवून घेतल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अमरावती उपप्रादेशिक कार्यालयातील भाग्यश्री पाटील ४२( सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी), सिद्धार्थ ठोके ( सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी) , गणेश वरुटे ( प्रादेशिक परिवहन अधिकारी), वरुण जिभेकर आर टी ओ एजंट तसेच प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असलेले शिवाजी गिरी ,अनिल संकटासिंग, शेख दिलावर मंसुरी उर्फ मामु, मोहम्मद अस्लम शेख असे एकूण ९ जणांना अटक केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon