मुंबईत लहान बाळांची चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

मुंबईत लहान बाळांची चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी सखोल तपास केला. या तपासातून पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीत एका डॉक्टराचादेखील समावेश आहे. तसेच आरोपी हे मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये काम करत असल्याची देखील माहिती पोलिसांच्या तापासातून समोर आली आहे.

वंदना अमित पवार, शितल गणेश वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर, डॉ. संजय सोपानराव खंदारे अशी आरोपींची नावे आहे. या सात जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून आतापर्यंत १४ लहान बाळांची विक्री आहे, तर पोलिसांना २ बाळांची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज (२८ एप्रिल) पत्रकार परिषद घेत माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींना अटक केल्यानंतर अधिक तपास केला असता, सातही आरोपी हे मुंबईतल्या काही रुग्णालयांमध्ये काम करत असल्याचे समोर आले. त्यामुळे आता मुंबईतील काही रुग्णालये ही मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये डॉ. संजय सोपानराव खंदारेचं दिव्यामध्ये दवाखाना आहे.मुळचा नांदेडचा रहिवासी असणारा हा डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आलं आहे.  पोलिस उपायुक्त रागासुधा आर. म्हणाले की, कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे हे पालक गेले असावेत. तिथं त्यांचा संपर्क झाला असावा असा आमचा संशय आहे. विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करून रत्नागिरीमध्ये देण्यात आलं होतं. तेलंगणामधून या बाळांची डिमांड होती आणि त्यानुसार या बाळांची विक्री केली जात होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून खास करुन या बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता, असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon