डेटिंग साईटवरची ओळख जेष्ठ नागरिकाला पडली २० लाखाला; कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

डेटिंग साईटवरची ओळख जेष्ठ नागरिकाला पडली २० लाखाला; कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे- राज्यात भामट्याकडून ऑनलाईन फसवणूक प्रकरणात जेष्ठ नागरिकांना जाळ्यात ओढले जात आहे. अशीच एक घटना कोरेगाव पार्क परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय जेष्ठ नागरिक यांच्या बाबतीत घडली आहे. डेटिंग साईटवरून ओळख झाल्यानंतर कॅपिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करायला सांगून २० लाख ५३ हजार ३६० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ९ जानेवारी ते २२ मार्च या कालावधीत घडला आहे. तक्रारदार यांची नेहा शर्मा हिच्याशी एका डेटिंग वेबसाइटवरून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात रोज संवाद सुरु झाला. एकदा नेहा हिने फिर्यादींना गुंतवणुकीबद्दल माहिती देऊन कॅपिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.

फिर्यादींनी सुरुवातीला ५० हजार रुपये गुंतवले. त्याचा नफा दिसून येत होता म्हणून नेहा हिने वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडून फिर्यादींकडून एकूण २० लाख ५३ हजार रुपये उकळले. त्यानंतर फिर्यादींनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पैसे काढता येत नव्हते म्हणून नेहा हिला विचारणा केली असता तिने आणखी पैसे भरण्यास सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते या करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon