पुण्यात गोळीबाराचं सत्र कायम, अग्रसेन शाळेसमोर एका तरुणावर गोळीबार; पोलिसांनी आकाश चंदालेला घेतलं ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. येरवड्यात पहाटे गोळीबार झाला यात एकावर तीन गोळ्या झाडल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्यातील एक गोळी त्याला लागली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येथील अग्रेसन स्कूल समोर हा प्रकार घडला आहे. जुना भांडणाचा वाद होता, दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. खरंतर पुण्यात आता कोयता गँगनंतर बंदूकबाजांनी डोकं वरती काढलंय. किरकोळ कारणातून देखील गोळीबार केला जात असल्याचं दिसत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, असाच सवाल आता निर्माण झालाय. बेकायदा पिस्तूल आणि त्यातून होणारे गोळीबार पोलिसांसाठी डोकं दुखी ठरू पाहत आहेत.
शहरात चौथ्या दिवशीही गोळीबाराचं सत्र कायम आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास येरवडा येथील अग्रसेन शाळेसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून एक गोळी तरुणाला लागल्याची माहिती आहे. पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समजतं आहे. विकी चंदाले, असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आकाश चंदाले याने हा गोळीबार केलाय. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मंगळवारी दुपारी पावने दोन वाजता बांधकाम व्यवसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
बुधवारी सकाळी हडपसर येथे व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या झाडल्या होत्या. गुरुवारी पहाटे भुमकर चौक नहरे येथे माचीस मागीतल्याच्या कारणातून दोघांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर आता येरवड्यात आता हा प्रकार घडला आहे. पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.