रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेना उमेदवारी; थेट विनायक राऊतांशी सामना
योगेश पांडे / वार्ताहर
रत्नागिरी – रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी गुरुवारी भाजपने जाहीर केली आहे. आता नारायण राणे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील.
त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचे निश्चिच झाले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांची १३ वी यादी घोषित केली असून त्यामध्ये रत्नागिरीमधून नारायण राणेंना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तत्पुर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.