पुणे तिथे काय उणे ! पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना; परिसरात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे शहरात मंगळवारी सायंकाळी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये ही गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सलग दोन दिवसाच्या गोळीबाराच्या घटनेनेमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पुण्यात मंगळवारी संध्याकाळी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. काल सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरुम समोरील धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी गोळीबाराची घटना घडली. पुण्यातील हडपसरमध्ये बुधवारी गोळीबाराची घटना घडली.
पुण्यातील हडपसरमधील शेवाळवाडीतील नंदिनी सोसायटीसमोर ही गोळीबाराची घटना घडली. व्यावसायिक वादातून एका माजी सैनिकाने गोळीबार केला. माजी सैनिक जयवंत खलाटे यांच्यावर आरोपी माजी सैनिक सुधीर शेडगे ने गोळीबार केला. खलाटे आणि शेडगे दोघेही माजी सैनिक आहेत. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र आरगडे यांच्यावर स्विगीचे वस्त्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळबार करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी डोक्यात हेल्मेट घातले होते. या दोघांनी पिस्तूल काढून दोन वेळा फार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळीबार न झाल्याने दोन्ही आरोपी पळून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.