येरमाळाचा मंडळ अधिकारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

येरमाळाचा मंडळ अधिकारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

धाराशिव – कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी देवानंद मरगू कांबळे यांना तक्रारदाराकडून ४ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दि. २८ मार्च रोजी दुपारी करण्यात आली. या प्रकरणी लाचखोर मंडळ अधिका-याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळ येथे देवानंद मरगू कांबळे यांनी चोराखळी येथील देवस्थानच्या जमिनीतून रॉयल्टी न भरता मुरूमाची वाहतूक करण्यासाठी तक्रारदाराकडे दि. २७ मार्च रोजी चार हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तसेच संबंधित तलाठी यांना कारवाई न करणेबाबत सांगतो म्हणाले होते. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून सापळा रचण्यात आला होता. मंडळ अधिकारी कांबळे यांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष चार हजार रुपये लाचेची मागणी करून दि. २८ रोजी लाच स्वत: स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक विकास राठोड यांनी पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे, मार्गदर्शक पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या पथकामध्ये पोलीस अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon