भाईंदरमध्ये रिक्षा चोरी करणाऱ्या सराईतला अटक; ८ गुन्हे उघडकीस येऊन ७ रिक्षा जप्त 

Spread the love

भाईंदरमध्ये रिक्षा चोरी करणाऱ्या सराईतला अटक; ८ गुन्हे उघडकीस येऊन ७ रिक्षा जप्त 

पोलीस महानगर नेटवर्क

भाईंदर – पोलिसांनी रिक्षा चोरास अटक करून त्याच्याकडून आठ गुन्ह्यांची केली उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. नवघर पोलीस ठाणे गुन्हा भा.दं. वि.सं. कलम -३७९ प्रमाणे १९ मार्च, २०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील फिर्यादी अभिमन्यु काशिराम कनोजीया (४० वर्षे), व्यवसाय- रिक्षा चालक, साई सम्राट सोसायटी, नवघर रोड, भाईंदर पूर्व हे रिक्षा चालक असुन‌ १८ मार्च रोजी दिवसभर रिक्षा चालवून ते रात्री-१०.३० वा.च्या सुमारास आशीष बार समोर रोडवर, नवघर फाटक रोड, भाईंदर पूर्व येथे रिक्षा पार्क करून ते आपल्या राहत्या घरी निघुन गेले. दुस-या दिवशी १९ मार्च रोजी सकाळी ७.३० वा फिर्यादी हे पुन्हा रिक्षा चालवण्यासाठी त्यांची रिक्षा घेण्यासाठी घटनास्थळावर गेले असता त्यांची रिक्षा त्यांना पार्क केलेल्या ठिकाणी मिळून आली नाही. त्यावेळी त्यांनी त्यांचा रिक्षाचा राहत्या परिसरात शोध घेतला त्यांची रिक्षा त्यांना कोठेही मिळाली नाही म्हणून फिर्यादी यांची रिक्षा चोरी झाल्याबाबत खात्री झाल्याने त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासुन वारंवार रिक्षा चोरीचे गुन्हे होत होते. सदरची बाब ही गंभीर असल्याचे लक्षात घेवुन पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१, सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सुचना, तसेच मागील काही दिवसांपासुन पोलीस ठाणे हददीतुन चोरी गेलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्हयांचा तपासा दरम्यान प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज, तसेच घटनास्थळावरुन व घटनास्थळाचे आजुबाजुवरुन प्राप्त केलेले सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज यांची एकत्रित पडताळणी केली असता पोलीसांनी गुन्हयातील संशयित आरोपी हा वारंवार येवुन रिक्षा चोरीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिक तपास केला असता गुन्हयातील आरोपी हा चोरी करण्यासाठी बोरीवली, मुंबई येथुन आले असल्याचे समजले होते. त्याप्रमाणे नमुद संशईत आरोपी याचा सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आय.सी कॉलनी बोरीवली पश्चिम परिसरात शोध घेतला असता शशीकांत मल्लेश कामनोर वय ३२ वर्षे, व्यवसाय- रिक्षाचालक,रा.लींक रोड फुटपाथवर मंडपेश्वर मेट्रोस्टेशनच्या बाजुला, बोरीवली पश्चिम, मुंबई मुळगाव गंजीखेड, जि.गुलबर्गा, कर्नाटक हा मिळुन आला होता. सदर आरोपी यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दि. १९/०३/२०२४ रोजी अटक करण्यात आली. आरोपी याच्याकडे पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या तपासात त्याचाकडुन एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाणे मुंबई तसेच नवघर पोलीस ठाणे अशा वेगवेगळया ठिकाणाहुन चोरी केलेल्या एकूण ७ ऑटो रिक्षा अशी एकुन रुपये – ७,६९,०००/- किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे तसेच तपासा दरम्यान नवघर पोलीस ठाणे तसेच एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाणे मुंबई येथील रिक्षाचोरीचे एकुन ८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर गुन्हयातील आरोपी याच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त,मीरा भाईंदर, पोलीस आयुक्तालय, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०१, राजेंद्र मोकाशी सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) अशोक कांबळे, सपोनि संदिप पालवे, पोउनि – ज्ञानेश्वर आसबे, सफौ/गौतम तोत्रे, पोह- भुषण पाटील, संतोष पाटील, पोह-सुरेश चव्हाण, पोह- नवनाथ घुगे, पोशि- ओंकार यादव, पोशि – सुरजसिंग घुनावत व त्यांच्या पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon