पिंपरी चिंचवड परिसरात ‘स्पा’ च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Spread the love

पिंपरी चिंचवड परिसरात ‘स्पा’ च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

निगडी – पिंपरी चिंचवड मधील निगडी परिसरात ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला. पोलिसांनी यावेळी चार तरुणींची सुटका केली. छापा टाकण्यात आलेल्या स्पा महिला मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलं आहे. निगडीतील फोनिक्स ‘स्पा’वर ही कारवाई करण्यात आली. दिनेश कुमार गुप्ता (३०, रा. मुंबई) आणि एक महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार सोनाली माने यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १७) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनिक्स स्पा नावाचे मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा लावत स्पा सेंटरवर छापा मारला.

संशयितांनी चार महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला असल्याचे समोर आले. यामध्ये पोलिसांनी चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस अंमलदार मारुती करचुंडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon