लातूर शहरात पुण्यानंतर कोयता गॅंगची प्रचंड दहशत ; गाड्यांची तोडफोड करत खंडणीची मागणी

Spread the love

लातूर शहरात पुण्यानंतर कोयता गॅंगची प्रचंड दहशत ; गाड्यांची तोडफोड करत खंडणीची मागणी

पोलीस महानगर नेटवर्क

लातूर – मागील काही दिवसांत लातूरमध्ये कोयता गँगची प्रचंड दहशत दिसून येत आहे.

अशीच घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पाहायला मिळाली असून, लातूर शहरात तब्बल तीन तास कोयता गँगची दहशत सुरू होती. खंडणी वसुली करणे, गाड्यांची तोडफोड करणे, लोकांना दहशत दाखवणे असे प्रकार शहरात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात दोन जणांपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री नऊ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहरात हा सर्व प्रकार सुरू होता.

लातूर शहरात दिवसेंदिवस गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढत आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुण मंडळी हातात धारदार शस्त्र आणि कोयता घेऊन फिरत असतात. भाजी मार्केटमध्ये येऊन भाजीवाल्याकडून जबरदस्ती पैसे वसूल केले जातात. त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली जाते. लोकांच्या अंगावर धारदार शस्त्र घेऊन धावून जातात. काल रात्री असाच प्रकार दोन तरुणांनी केला आहे. तोहित पठाण आणि मोन्या बनसोडे अशी या तरुणांची नावे आहेत.

लातूर शहरातील भाजी मार्केटमध्ये तोहित पठाण आणि मोण्या बनसोडे या दोघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी एक ट्रॅव्हल आणि एक कारची तोडफोड केली. यात अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान आले आहे. भाजीवाल्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्यात आले आहेत. बिडवे इंजीनियरिंग कॉलेजपासून गांधी चौकापर्यंत या तरुणांनी दहशत निर्माण केली होती. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला कळाल्यानंतर पोलिसांची दोन पथक रवाना केली. यातील तोहीत पठाण याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, मोन्या बनसोडे अद्याप फरार आहे. पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून,  पोलीस पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon