शंभरहून अधिक प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा ; धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रातील दुसऱ्यांदा प्रकार

Spread the love

शंभरहून अधिक प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा ; धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रातील दुसऱ्यांदा प्रकार

पोलीस महानगर नेटवर्क

धुळे – येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना दुसऱ्यांदा घडली. गुरुवारी रात्रीच्या जेवणातून सुमारे १००हुन अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याचे वृत्त खरे आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली.

धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात सहाशे प्रशिक्षणार्थी आहेत. या सर्वांनी १४ मार्चला सायंकाळी सातनंतर जेवण केले. यानंतर येथील शंभराहून अधिक प्रशिक्षणार्थींना मळमळ, उलटी, जुलाब असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे प्राचार्य विजय पवार यांनी यंत्रणेच्या मदतीने शंभरावर प्रशिक्षणार्थींना तातडीने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेले. यानंतर सर्व प्रशिणार्थींवर रात्री उपचार करण्यात आले.

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना आधीच कळविण्यात आली होती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच वैद्यकीय यंत्रणा अलर्ट होती. हिरे रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांवर त्वरित उपचार सुरू केले. त्यामुळे सर्व बाधित रुग्णांची प्रकृती आता सुधारत आहे, अशी माहिती डॉ. रवी सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

विषबाधा होण्याची दुसरी घटना

धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा होण्याची पुनरावृत्ती झाली आहे. काही वर्षांपूर्वी देखील अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी तरुणींचे प्रशिक्षण सुरू होते. त्यांनाही तातडीने उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला होता. अन्नातून विषबाधा झाल्याची घटना दुसऱ्यांदा घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon