ठेकेदारीच्या वादातून महाड येथे एकाची हत्या ; मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

Spread the love

ठेकेदारीच्या वादातून महाड येथे एकाची हत्या ; मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

ओमकार नागावकर

महाड – महाड तालुक्यातील वहूर येथे ठेकेदारी घेण्यावरून दोन परप्रांतिय कामगारांमध्ये झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

छगन शामराव मोहीते ( मुळ गाव. मलकापुर जालना) सध्या रा. हनीफ प्लाझा बिंडींगच्या समोरील मोकळ्या जागेत वहूर ता.महाड व लखन बाबाराव चव्हाण वय २२ वर्षे रा. जाफराबाद ता जाफराबाद जि जालना सध्या रा. हनीफ प्लाझा बिल्डींगच्या समोरील मोकळया जागेत वहूर ता महाड जि रायगड या दोघांमध्ये कामाची ठेकेदारी घेण्यावरून वाद होता.

या ठेकेदारीच्या कारणावरुन रविवारी १० मार्च रोजी) रात्री या दोघांमध्ये जोराचे भांडण झाले. याच रागातून छगन मोहीते याने लखन चव्हाणची हत्या केली व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र सकाळी हे अर्धवट जळालेले प्रेत वहूर उगवतवाडी येथे हनीफ प्लाझा बिल्डिंग जवळील शेतात आढळून आले.

याची माहीती पोलिस पाटील यांच्याकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांना देण्यात आली. यानंतर तपासाची सुत्र हलली असता छगन मोहीते याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात भादंवि कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पूढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon