काशिमीरा येथे लग्नसमारंभात व गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या त्रिकुटास बेड्या

Spread the love

काशिमीरा येथे लग्नसमारंभात व गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या त्रिकुटास बेड्या

प्रकाश संकपाळ

 

ठाणे – मीरा,भाईंदर व काशीमीरा या सारख्या वर्दळीच्या ठिकाणी व लग्नसमारंभात हातसफाई करणारी टोळीला काशीमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दि. ०६/०१/२०२४ रोजी जीसीसी क्लब काशीमीरां येथे लग्न समारंभ चालू असताना त्यामध्ये एक आठ वर्षाचा मुलगा, दोन महिला व दोन पुरुष लग्नामध्ये येऊन त्यांनी ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ मोबाईल व रोख रक्कम असलेली पर्स चोरी चोरी झाल्याची तक्रार काशीमिरा पोलिस ठाणेत गु.र. नं. १६/२०२४,भा. द. वि. ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपींचा शोध घेऊन आरोपी मोनू नरपत सिंग सिसोदिया,(२७), रां. गाव कडीया सांसी, पो पिपलिया, राजगढ, मध्यप्रदेश, सुनयना हरबिर सिंग सिसोदिया, (२३), गाव कडीया सांसी, पो पिपलिया, राजगढ, मध्यप्रदेश, उत्तरा मोकमसिंग सिसोदिया,(२०), रा. गाव कडीया सांसी, पो पिपलिया, राजगढ, मध्यप्रदेश,

यांना अटक केली. तरी सदर आरोपी यांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीत देखील गुन्हे केल्याची शक्यता असल्याने आरोपी यांच्याबाबत आणखी काही माहीती हवी असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक, योगेश काळे,९८६७८८४६६३67 व पोलीस उपनिरीक्षक, शिवाजी खाडे, ९९६७७१५८४ वर संपर्क साधण्याचे आवाहन काशिमीरा पोलीस ठाणे, मिरारोड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon