गोंदियामध्ये जुगार अड्ड्यावर धाड टाकून ९ आरोपींना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गोंदिया – पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंदया विरूद्ध प्रभावी धाड मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने ६ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीतील डांगोर्ली शेतशिवार, नाला परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली. यामध्ये ५२ तासपत्यावर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळ खेळणाऱ्या ९ इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
तासपत्त्यावर जुगार खेळ खेळणाऱ्या आरोपींकडून रोख रक्कम १५,४००/- रु., ४९,०००/- रु. किंमतीचे ६ मोबाईल फोन, तसेच ७५,०००/- रु.किमतीच्या दोन मोटर सायकली, चटई व तासपत्ती किमती ३००/- रु असा एकुण १ लाख ३९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार खेळ खेळणारे आरोपी देवीलाल ग्यानिराम कहनावत (४०) रा. किन्ही, राजकुमार शोभेलाल जमरे (४०) रा.. डांगोर्ली, अशोक मंगल नागपुरे (४५) रा. कोहका, सचिन प्रेमलाल मेश्राम (३०) रा. दासगाव, राधेलाल हनसलाल मेश्राम (४४) रा. डांगोर्ली, राजेद्र रामचंद्र नान्हे ( ३३) रा. डांगोर्ली, कंचन कमलप्रसाद दमाहे (२७) रा. कोहका, दौलत सुखराम मात्रे (४०) रा. रजेगाव (बगडमारा) ता. किरणापुर जि. बालाघाट (म.प्र), शैलेश नामदेव कुथे (२८) रा. रजेगाव ता. किरणापुर जि. बालाघाट (म.प्र) यांचेविरुध्द पोलीस ठाणे रावणवाडी येथे कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पो.हवा. विठ्ठल ठाकरे, सोमू तुरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, अजय रहांगडाले, दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे तसेच पो.हवा. रणजीत बघेले, पो.शि. नरेन्द्र मेश्राम, पोलीस ठाणे रावणवाडी यांनी केली.