चितळसरमध्ये लाखोंची घरफोडी ; चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरू

Spread the love

चितळसरमध्ये लाखोंची घरफोडी ; चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरू

ठाणे –ठाणे परिसरात विविध ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाली असून गेल्या अनेक घरांना त्यांनी लक्ष केले आहे.पोलिसांनी अनेकवेळा कारवाई करून देखील चोरट्याना कोणतीच भीती वाटत नसल्याने दिसून येत आहे.महाले चाळ, पोखरण रोड परिसरातील राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने त्यावाटे आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २,४८,०००/- रु.किंमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला आहे.
याबाबत फिर्यादी चंद्रकांत हरिश्चंद्र महाले (२९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. ८९/२०२४ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवाडे हे़ करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon