डोंबिवलीतील जैन मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस १२ तासाच्या मुद्देमालासहित अटक

Spread the love

डोंबिवलीतील जैन मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस १२ तासाच्या मुद्देमालासहित अटक

प्रकाश संकपाळ

डोंबिवली – आदिनाथ गृह जिनालय जैन मंदिर,पाश्वगज जैन संघ चॅरिटेबल ट्रस्ट मंदिर व शांतीलाल जैन मंदिर या ठिकाणी चोरट्यान उघड्या दरवाजातून प्रवेश करून २ चांदीची फुले,एक चांदीचा नारळ,एक चांदीची आरतीची थाळी,एक चांदीचा दिवा,एक चांदीचा कलश असे एकूण १५७० ग्रॅम वजनाचे एकूण ९५०००/-रु.किंमतीच्या चांदीच्या वस्तू लबाडीने चोरून नेल्या म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्यादी भावीन अमृतलाल संगोई (४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं.७९/२०२४ भा. द. वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे पाठपुरावा करून गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासांच्या आत सदर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून ८० हजार किमतीची १०९८.२० ग्रॅम वजनाची चांदीची लगड हस्तगत करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमेश अगरचंद जैन (४७),असून तो मुंबईतील खेरवाडी,गिरगाव येथील राहणारा आहे,त्याची सखोल चौकशी केली असता पकडण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील काळाचौकी, सायन, एलटी मार्ग,आग्रीपाडा,आझाद मैदान,मलबार हिल,घाटकोपर,डी.एन.नगर व बोरिवली पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपीने पूजा करण्याच्या बहाण्याने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले आहे.सदरची यशस्वी कामगिरी कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त,डोंबिवली विभाग,कुराडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते,पोलीस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे,पोलीस हवालदार सुनील भणगे,विशाल वाघ,सचिन भालेराव,तुळशीराम लोखंडे व त्यांच्या पथकाने केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon