पट्टेरी वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Spread the love

पट्टेरी वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

प्रकाश संकपाळ

कल्याण – कल्याण-शीळ रोडवरील क्लासिक हॉटेलजवळ पट्टेरी वाघाचे कातडे, देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली करून त्यांच्याकडून पट्टेरी वाघाचे कातडे, देशी बनावटीचे पिस्टल ,२ जिवंत राऊंड,२ मोबाईल व आधारकार्ड असा एकूण ४५,५२०००/-रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सीताराम रावण नेरपगार व ब्रिजलाल साईझींग पावरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon