मुंब्रा स्थानक परीसरातुन रिव्हॉल्वर व पिस्टल सह पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद
प्रकाश संकपाळ
ठाणे – रिव्हॉलवर व देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. राकेश मेहता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने मुंब्रा पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील एम गेट जवळ सापळा रचून राकेश मेहता यास पकडण्यात आले. त्याच्याजवळील १ देशी बनावटीचे मॅगझीनसह पिस्टल,६ चेंबरचे रिव्हॉल्व्हर आणि ३ जिवंत काडतुसे असा एकूण ६५,६००/- रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर, अप्पर पोलीस आयुक्त डॉ.महेश पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१, गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग, विजयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार आणि त्यांच्या पथकाने केली.