दारूच्या दुकानात मालकाकडून कामगाराची निर्घृण हत्या; मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

दारूच्या दुकानात मालकाकडून कामगाराची निर्घृण हत्या; मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

बीड – बीड कामगार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. कामगाराचा खून करून आरोपी लपून बसला होता. पोलिसांना आरोपीचा पत्ता कळाल्यावर अतिशय शिताफीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

एका दारूच्या दुकानात मालकाकडून कामगार उमेश दळवीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बीडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. ३५ तासानंतर मृतदेह ताब्यात घेत आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात आला होता. आरोपीला लवकरात लवकर अटक करू असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर मृतदेह कार्यालयातून हटवण्यात आला.मंगळवारी पहाटेच्या दरम्यान आरोपी लाला शेख हा बालेपिर परिसरामध्ये लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपी लाला शेख याला बेड्या ठोकल्या असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.

दुकानातील हिशेबाच्या कारणावरून दारूच्या दुकानावर काम करणाऱ्या उमेश दळवी (३५) या तरुणाला दोरीने बांधून अमानुषपणे मारत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. उमेश हा बीडमधीलदारू दुकानावर काम करायचा. शनिवारी रात्री दुकानातील पैशांच्या हिशेबाच्या कारणावरून त्याला मारहाण करण्यात आली.गंभीर मारहाणीत उमेशचा मृत्यू झाला.

आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मृताचे नातेवाईक अत्यंत आक्रमक झाले होते. नातेवाईकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर रविवारी मध्यरात्री शेख इरफान शेख समद ऊर्फ लाला याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon