कोलशेतमध्ये अवैध डम्पिंगवर महापालिकेचा दणका; वाहनांवर ६० हजारांचा दंड

कोलशेतमध्ये अवैध डम्पिंगवर महापालिकेचा दणका; वाहनांवर ६० हजारांचा दंड

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : कोलशेत परिसरात अवैधरित्या डेब्रीचे डम्पिंग करणाऱ्या वाहनांवर ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मंगळवारी कारवाई करत संबंधित वाहन चालकांकडून तब्बल ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कोलशेत परिसरात काही वाहनांकडून अनधिकृतपणे डेब्री टाकण्यात येत असल्याची माहिती महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित ठिकाणी पाहणी करून ही कारवाई केली. अवैध डम्पिंगमुळे परिसराच्या स्वच्छतेबरोबरच पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलल्याचे सांगण्यात आले.

या कारवाईत जप्त करण्यात आलेले डेब्री पुढील प्रक्रियेसाठी अधिकृत प्रकल्पाकडे पाठविण्यात आले. शहरात अनधिकृतपणे डेब्री टाकणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

सदर कारवाई आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, अभियंता किशोर गुळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक साईराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक चारु गोटे आणि स्वच्छता निरीक्षक सुमित जाधव यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon