काशीद बीचवर मृत्यूच्या दाढेतून पती-पत्नीची सुटका; रायगड पोलिसांच्या शौर्याचा गौरव

काशीद बीचवर मृत्यूच्या दाढेतून पती-पत्नीची सुटका; रायगड पोलिसांच्या शौर्याचा गौरव

पोलीस महानगर नेटवर्क

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या तीव्र प्रवाहात वाहून जाऊन बुडण्याच्या स्थितीत असलेल्या पती-पत्नीचे प्राण वाचवण्यात रायगड पोलीस दलातील दोन पोलीस अंमलदारांनी धाडसी कामगिरी बजावली. तत्परता, धैर्य आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी दोघांनाही सुरक्षित बाहेर काढत मोठा अनर्थ टाळला.

या शौर्यपूर्ण आणि मानवतावादी कार्याची दखल घेत रायगडच्या पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांनी संबंधित दोन्ही पोलीस अंमलदारांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव केला.

घटनेदरम्यान समुद्रात अचानक वाढलेल्या प्रवाहामुळे पती-पत्नी खोल पाण्याकडे ओढले जात होते. किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

या धाडसी कामगिरीमुळे रायगड पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon