दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज, तर मंदिरात हिंदूंना प्रवेश बंदी का?

दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज, तर मंदिरात हिंदूंना प्रवेश बंदी का?

नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका; उपायुक्त अतुल झेंडे यांना निवेदन सादर

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईदच्या दिवशी रस्त्यावर होणाऱ्या नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.नमाजासाठी रस्त्यांचा वापर करू नये, तसेच त्या दिवशी दुर्गाडी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश देण्यात यावा,अन्यथा हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठणाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भाजप नगरसेवक महेश पाटील आणि हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे. या संदर्भातला निवेदन कल्याण डीसीपी अतुल झेंडे यांना देण्यात आला आहे.

या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना निवेदन सादर केले.निवेदनात बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ला परिसरातील ईदगाहवर होणाऱ्या नमाज पठणादरम्यान परिसरातील रस्त्यावरील नमाज आणि मंदिर प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.नमाज पठण सुरू असताना दुर्गाडी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश दिला जात नाही.दोन समाजात कोणत्याही प्रकारचा तेड निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची ही भूमिका असते.

मागील चाळीस वर्षांपासून शिवसेना आणि आणि हिंदूत्ववादी संघटना बगरी ईदच्या दिवशी घंटानात आंदोलन करीत आहेत. त्यांची मागणी असते आम्हाला बकरी ईदच्या दिवशी मंदिरात प्रवेश बंदी का? सर्व धर्मीयांना समान वागणूक मिळाली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. त्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्तही तैनात केला जातो.

बुधवारी भाजपा नगरसेवक महेश पाटील आणि काही हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी करताना नमाजासाठी सार्वजनिक रस्त्यांचा वापर टाळण्याची व्यवस्था करावी आणि मंदिर प्रवेशावरील निर्बंध हटवावेत,असे म्हटले आहे. अन्यथा बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी परिसरात हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करून आंदोलन करण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान,या विषयावर अद्याप प्रशासनाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.मात्र सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.या मागण्यांमुळे आणि आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे दुर्गाडी परिसरातील वातावरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले असून प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon