अहिल्यानगरात सराफ दुकानात चोरी; संशयित महिला-पुरुषांचा पोलीसांकडून शोध
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगर : तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील चंदू काका सराफ या दुकानात चोरीची घटना घडली असून, या प्रकरणातील संशयित महिला व पुरुषांचा पोलीसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.
या चोरीप्रकरणी नागरिकांनी संशयितांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात हेड कॉन्स्टेबल अरविंद भिंगारदिवे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, माहिती देण्यासाठी 9119155771 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.