ग्लुकोज औषधांच्या नावाखाली गोवा निर्मित मद्याची तस्करी उघड; नवी मुंबईत १.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त

ग्लुकोज औषधांच्या नावाखाली गोवा निर्मित मद्याची तस्करी उघड; नवी मुंबईत १.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क 

नवी मुंबई : ग्लुकोज मेडिसीनच्या नावाखाली बनावट इन्व्हॉइस तयार करून गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, परराज्यातील मद्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दि. १४ मे रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमसमोरील रस्त्यावर भरारी पथकाने सापळा रचला होता.

सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास एमपी-०९-GG-७९२९ क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा सहाचाकी कंटेनर संशयास्पदरीत्या आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेल्या रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या १८० मिलीच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. हे मद्य गोवा राज्यात निर्मित असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत एकूण १२८० बॉक्समधील ११,०५९ बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनरसह एकूण १,४८,३३,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०७/२०२६ दाखल करण्यात आला असून रणजितसिंग अमरजित सिंग याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक एम. पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, एस. आर. मिसाळ तसेच भरारी पथकातील जवानांनी या कारवाईत सहभाग घेतला.

प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon