दिवे घाटात कोयता गँगचा धिंगाणा; १५० वाहनांसह आलेल्या टोळक्याने माजवली दहशत

दिवे घाटात कोयता गँगचा धिंगाणा; १५० वाहनांसह आलेल्या टोळक्याने माजवली दहशत

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : पुण्याच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील दिवे घाट परिसरात घडली आहे. काल रात्री १०० ते १५० वाहनांवरून आलेल्या एका टोळक्याने हातात तलवारी आणि कोयते घेऊन परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आमदार रोहित पवार यांनी तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पुण्यातील गुन्हेगारी वाढण्याआधीच अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे शहर पोलीस यांना टॅग करत, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित टोळक्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon