पिस्तुलाचा धाक दाखवून ६९.९० लाखांची चोरी; ७२ तासांत आरोपी जेरबंद

पिस्तुलाचा धाक दाखवून ६९.९० लाखांची चोरी; ७२ तासांत आरोपी जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

अकोला : पिस्तुलाचा धाक दाखवून सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा तब्बल ₹६९ लाख ९० हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार अकोला पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आली होती. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत आरोपीला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विविध विशेष पथके तयार केली होती. आरोपीचा माग काढण्यासाठी शहरातील तसेच विविध मार्गांवरील तब्बल ५८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमारे ७०० किलोमीटरचा प्रवास करत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon