जखमी करून ७० तोळे सोन्याची लूट; तीन दिवसांत दोन आरोपी साताऱ्यातून ताब्यात

जखमी करून ७० तोळे सोन्याची लूट; तीन दिवसांत दोन आरोपी साताऱ्यातून ताब्यात

पोलीस महानगर नेटवर्क 

नवी मुंबई : फिर्यादीला जखमी करून सुमारे ४० लाखांहून अधिक किंमतीचे ७० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या तीन दिवसांत नवी मुंबई आणि सातारा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन फरार आरोपींना साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीवर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि त्यांच्याकडील मोठ्या प्रमाणातील सोन्याचे दागिने लंपास केले. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. त्यानुसार नवी मुंबई आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या तीन दिवसांत सातारा येथून दोघांना ताब्यात घेतले.

दरम्यान, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच लंपास केलेल्या दागिन्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon