नाशिक धर्मांतर प्रकरणात एसआयटीच्या हाती मोठे पुरावे;वपीडितांना शीत पेय, शिरखुरम्यातून गुंगीकारक पदार्थ देऊन अत्याचार

नाशिक धर्मांतर प्रकरणात एसआयटीच्या हाती मोठे पुरावे;वपीडितांना शीत पेय, शिरखुरम्यातून गुंगीकारक पदार्थ देऊन अत्याचार

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – नाशिकमधील बहुचर्चित मल्टिनॅशनल कंपनीत लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतर प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येतायत. या प्रकरणाचा तपास आयआयटी कडून केला जातोय. या तपासादरम्यान एसआयटी च्या हाती धक्कादायक माहिती लागलीये. पीडित महिलांना शिरखुरमा आणि काही थंड पेयांमध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचे काही पुरावे एसआयटी च्या हाती लागलेत. सोबतच धर्मांतरासाठी किंवा महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी कोणत्याही संघटनेकडून किंवा बाह्य स्त्रोतांकडून आर्थिक फंडिंग झाले का ? याचा तपास एसआयटी अत्यंत गोपनीय पद्धतीने करत असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान या प्रकरणातील निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. गुन्ह्याचे स्वरुप अत्यंत गंभीर असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय. आता अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं निदाच्या वकिलांनी सांगितलंय.

या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्यात.आरोपींना कडक शिक्षा झाली नाही तर बजरंग दल रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय

नाशिकच्या मल्टिनॅशनल कंपनीच्या प्रकरणात एसआयटी च्या तपासातून उलगडणारे धागेदोरे अत्यंत धक्कादायक आहेत.प्रकरणातील तौसीफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि रझा मेमन ह्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची सुनावली पोलीस कोठडी सुनावलीये. या पोलीस कोठडी दरम्यान एसआयटीच्या हाती आणखी काही महत्वाचे पुरावे लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon