नायरा पेट्रोल पंपावर मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; पिता-पुत्र थोडक्यात बचावले

नायरा पेट्रोल पंपावर मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; पिता-पुत्र थोडक्यात बचावले

पालघर / नवीन पाटील 

पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व येथील नायरा पेट्रोल पंपावर रविवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या ड्राय सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून चालक व त्याचा मुलगा सुदैवाने थोडक्यात बचावले.

माहितीनुसार, दुचाकीस्वार पेट्रोल भरून पंपावरून बाहेर पडत असताना संबंधित ट्रक अचानक सुरू करण्यात आला. चालकाचे दुर्लक्ष झाल्याने मिक्सरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी काही अंतर पुढे ओढली गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेत मोठा अपघात टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

पेट्रोल पंपासारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहन सुरू करताना आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सफाळे पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पेट्रोल पंप परिसरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon