नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळून मृत्यू; कॉलेज प्रशासनाकडून अंतर्गत चौकशी

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळून मृत्यू; कॉलेज प्रशासनाकडून अंतर्गत चौकशी

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – नाशिक शहरात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. नाशिक वैद्यकीय महाविद्यालय येथे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर लिफ्ट कोसळल्याने मृत्यू झाल्याचे समोर आला आहे.. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्योती अहिरे नावाच्या महिला कर्मचारी नेहमीप्रमाणे आपलं काम करत असताना अचानक ही दुर्घटना घडली. सोमवारी सकाळी मेडिकल कॉलेज मधील घटनेते महिला कर्मचारी झाली होती गंभीर जखमी झाली होती. महिलेवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन काम करत असताना इक्विपमेन्ट लिफ्ट महिलेच्या अंगावर पडल्याची घटना घडली.

घटनास्थळी मुलाने धाव घेत घटनास्थळावरील परिस्थिती बघून मुलाचा आक्रोश केला . मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून अंतर्गत चौकशी समिती स्थापनकरून अहवाल तयार करण्याचा निर्देश देण्यात आले आहेत. आडगाव पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे डीन सुधीर भामरे म्हणाले, ऑपरेशन थिएटरमध्ये दुर्घटना घडली आहे. तिथं काम करणाऱ्या ज्या मावशी आहेत त्या ड्रम ठेवण्यासाठी ड्रमच्या लिफ्टजवळ गेल्या. त्यांनी दरवाज्यातून लिफ्ट कुठे आहे हे वाकून बघत होत्या, त्याचवेळी वरून लिफ्ट आल्यामुळे त्यांची मान लिफ्टमध्ये अडकली आणि त्यांना मणक्याला इजा झाली या संपूर्ण दुर्घटनेची इंटर्नल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हॉस्पिटने या संदर्भात परिपत्रक काढत खुलासा केला आहे. ती लिफ्ट नसून शस्त्रक्रियेदरम्यान लागणाऱ्या उपकरणांचे ड्रम वाहून नेणारी ट्रॉली (हॉइस्ट ट्रॉली) आहे. तसेच, याबाबत शासकीय विद्युत अभियंता यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदर ट्रॉली कोसळलेली नाही किंवा त्यामध्ये तांत्रिक बिघाडही झालेला नाही, असे त्यांच्या तपासात निष्पन्न झालेले आहे. यातील जखमी महिला ज्योती शिवाजी अहिरेया रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात. घटना घडण्यापूर्वी महिला कर्मचारी घटनास्थळी ड्रम घेऊन उभी होती. महिलेने मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता सुरक्षा सीमारेषा ओलांडून ट्रॉलीमार्गात डोकावून पाहत असताना ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी अन्य कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत सदर महिलेला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon