पुण्यात गोळीबाराचा थरार; वारजे परिसरातील एका सलूनमध्ये घुसून ३-४ जणांनी केला गोळीबार, २ जण जखमी

पुण्यात गोळीबाराचा थरार; वारजे परिसरातील एका सलूनमध्ये घुसून ३-४ जणांनी केला गोळीबार, २ जण जखमी

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – गेल्या काही काळापासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना काही प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. शुक्रवारी सायकांळी ८ च्या सुमारात पुण्यात गोळीबाराचा थरार पहायला मिळाला. वारजे परिसरातील एका सलूनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ३-४ जणांनी सलूनमध्ये घुसून हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत २ जण जखमी झाले असल्याचेही समोर आले आहे.

पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वारजे परिसरातील एका सलूनमध्ये गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. ३-४ जणांनी दुकानात घुसून केलेल्या गोळीबारात २ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत गोळीबार करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या तरूणाची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्याच्या वारजे भागात सायंकाळच्या वेळेला लोकांची मोठी गर्दी असते, याच गर्दीच्या वेळी हा गोळीबार झाला आहे. गोळीबार करताना वापरलेली बंदूक तरूणाच्या हातात फुटल्याचेही समोर आलेले आहे. त्यामुळे या घटनेत गोळीबार करणाऱ्याच्याही हाताला जखम झाली आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून या गोळीबारामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुण्यातून याआधीही गोळीबाराच्या घटना समोर आलेल्या आहेत. मात्र शुक्रवारी वर्दळीच्या भागात रहदारी असताना हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण याआधीच्या घटनांमध्ये गँगवॉरमधून गोळीबार आणि खून झाल्याचे समोर आले होते. शुक्रवारी घडलेल्या घटनेत गँगवॉर तर नाही ना हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच आता पुणे पोलीस या घटनेतील आरोपींवर नेमकी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. तसेच आगामी काळा अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon