पुण्यात एम.डी. ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; वाघोली पोलिसांकडून दोघे जेरबंद, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात एम.डी. ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; वाघोली पोलिसांकडून दोघे जेरबंद, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर अंकुश आणण्याच्या दृष्टीने वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्सची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ३१ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी योगेश कणगरे आणि सोनू सिंग यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून ३७ ग्रॅम ३ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) पावडर, एक मोबाईल फोन आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३१,०६,००० रुपये इतकी आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ७) सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (लोणीकंद विभाग) नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या कारवाईमुळे पुणे परिसरातील अमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon