शांती नगर पोलिसांची तत्पर कामगिरी; हरवलेला ३ वर्षांचा मुलगा सुखरूप सापडला

शांती नगर पोलिसांची तत्पर कामगिरी; हरवलेला ३ वर्षांचा मुलगा सुखरूप सापडला

पोलीस महानगर नेटवर्क 

भिवंडी : रामनगर परिसरातून दुपारी हरवलेला तीन वर्षांचा फरहाद शेख याचा शांती नगर पोलिसांनी वेगाने शोध घेत त्याला सुखरूप शोधून काढले. या घटनेमुळे परिसरात दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

मुलगा हरवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, स्थानिक नागरिकांकडून माहिती संकलन आणि विविध ठिकाणी शोधकार्य राबवत पोलिसांनी अल्पावधीतच फरहादचा ठावठिकाणा लावला.

यानंतर मुलाला सुरक्षितपणे त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका कुटुंबाचा मोठा अनर्थ टळला असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon