बारमध्ये पैसे उडवण्याच्या सवयीमुळे निवडला चोरीचा मार्ग; तीन सराईत चोरट्यांना महात्मा फुले पोलिसांनी गोवंडीतून केली अटक

बारमध्ये पैसे उडवण्याच्या सवयीमुळे निवडला चोरीचा मार्ग; तीन सराईत चोरट्यांना महात्मा फुले पोलिसांनी गोवंडीतून केली अटक

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बारमध्ये पैसे उडवण्याच्या सवयीमुळे तीन जणांनी चोरीचा गुन्हा केला. या सराईत चोरट्यांना कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे. रामबाग परिसरात एका नामांकित हॉटेल चालकाचा गळ्यातील महागडी चेन हिसकावून तीन चोरटे फरार झाले होते. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली होती.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.पोलिसांनी सापळा रचत एका बारमधून तिघांना ताब्यात घेतले. दिलनवाज अन्सारी,रिजवान खान आणि शाहरुख शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी मुंबईतील गोवंडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत एका बारमधून तिघांना ताब्यात घेतले.

दिलनवाज अन्सारी,रिजवान खान आणि शाहरुख शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे,या तिघांना बारमध्ये जाऊन पैसे उडवण्याची सवय असून त्यासाठीच ते चोरी आणि लूटमार करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान,या आरोपींनी आतापर्यंत आणखी किती चोरी आणि लूटमार केल्या आहेत, याचा सखोल तपास पोलीस अधिकारी विकास मडके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon